लासलगांव बाजार समितिवर महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 15:31 IST2019-08-29T15:29:44+5:302019-08-29T15:31:50+5:30
लासलगाव . कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला राज आले असून सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लासलगांव बाजार समितिवर महिला राज
लासलगाव : कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला राज आले असून सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरूवारी दुपारी नाशिक जिल्हा उपनिबंधक गौतम मालसाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभा आयोजित करण्यात आली होती. संचालकाच्या उपस्थितीत बैठक सुरू होताच सभेचे अध्यक्ष गौतम मालसाणे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजात सभापती पदाकरीता सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांचे एकमेव अर्ज आले. संचालक पंढरीनाथ थोरे ,राजेंद्र डोखळे,नानासाहेब पाटील, सुभाष कराड, शिवनाथ जाधव , रमेश पालवे, वैकुंठ पाटील, नंदकुमार जागा, मोतीराम मोगल, अनिता सोनवणे, भास्करराव पानगव्हाणे उपस्थित होते. सभेस माजी सभापती जयदत्त होळकर, संदीप दरेकर, बाळासाहेब क्षीरसागर, अशोकराव गवळी व सचिन ब्रम्हेचा अनुपस्थित होते. बाजार समतिी सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते. सभापती सुवर्णा जगताप या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रसिध्दी प्रमुख असुन त्यांच्या निवडीने या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी विराजमान झाल्या आहेत.