शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:29 IST

येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही कसरत करावी लागत आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे पिण्यासाठी तरी पाणी मिळेल का नाही, असा प्रश्न आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यात आज २९ गावे व २ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत रोजच भर पडत आहे. गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विहिरी कूपनलिकेची पातळी खालावल्याने अनेक जलस्रोत पाण्याअभावी बंद पडले आहेत. तसेच नागरिकांसह मुक्या जनावरांना तसेच पशुपक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे. असे असतानाही शेतकºयांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे. मात्र पाणी लागत नाही एक हजार फुटापर्यंत बोअरवेल घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार अशी अवस्था झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही नदी-नाले, ओढे, साठवण तलाव पाण्याने भरलेच नाही त्यामुळे पाण्याचा ठणठणात आहेत. त्यातच पाण्याच्या व्यवस्थेसाठी टँकरच्या, कूपनलिका अधिग्रहणाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील साठवण तलावातील पाण्याचे योग्य ते नियोजन न केल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.दूषित पाण्याने आरोग्य धोक्यातयेवला तालुक्यात विहिरी, कूपनलिकांची पातळी कमालीची खालावल्याने व ना दुरुस्त कूपनलिकांची संख्या अधिक वाढल्याने पाणीटंचाईत भरच पडत आहे. तालुक्यात दूषित जलस्त्रोतांचे प्रमाण मोठे असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो. येवला तालुक्यात विहिरी, विंधनविहिरी आदी स्रोतांचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापर असतात. मात्र तालुक्यात अस्तित्वात असणाºया हातपंपाचे पाणी दूषित, क्षारयुक्त झालेले आहे असे पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई व दूषित जलसाठा यामुळे ग्रामीण भागातील नागरिकदेखील जारचे, फिल्टर केलेले पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत शुद्ध ठेवण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, जलदुतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई