अशोकामार्गासह जेलरोडला महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:56 PM2020-02-12T17:56:23+5:302020-02-12T17:58:15+5:30

नाशिक : अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रूग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी ...

Women's gold chains were jolted along the Ashoka Marg | अशोकामार्गासह जेलरोडला महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडल्या

अशोकामार्गासह जेलरोडला महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडल्या

googlenewsNext
ठळक मुद्देचोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैदवीस दिवसांत दुसरी घटना

नाशिक : अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रूग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना बुधवारी (दि.१२) दुपारच्य सुमारास जेलरोड परिसरात घडली. या घटनेतील संशयित दुचाकीस्वार चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याने उपनगर पोलिसांनी त्यांना जेतवननगर भागात ताब्यात घेतले.
गणेशबाबानगरमधील एका खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी रहाता येथून श्वेता व्यंकटेश चिस्ते (२९) या आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास रूग्णालयातून औषधे घेण्यासाठी बाहेर पडल्या. गणेशबाबा मंदिरापासून पुढे येत मुख्य अशोकामार्गाच्या दुभाजक पंक्चरच्याजवळ आल्यानंतर त्यांनी जवळच्या मेडिकलमधून औषधे घेतली यावेळी पुन्हा पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी खेचली. यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी चोरट्याने सोनसाखळी तोडल्याने पेंडल रस्त्यावर पडलेले श्वेता यांना आढळून आले; मात्र त्या पेंडली ३० ग्रॅमची सोन्याची साखळी घेऊन पळून जाण्यास चोरटा यशस्वी झाला. श्वेता यांच्या फिर्यादीनुसार ३० हजार रूपयांची सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
--इन्फो--
वीस दिवसांत दुसरी घटना; महिलांमध्ये भीती
अशोकामार्ग परिसरात दरमहा एकतरी सोनसाखळी चोरीची घटना घडत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशोका चौफूली सिग्नलवर पोलीस चौकी असूनदेखील चोरटे सर्रासपणे अशोकामार्गावर सोनसाखळी चोरी करत असल्याचे महिलांनी सांगितले. रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी तसेच संध्याकाळच्यावेळी महिलांची अशोकामार्गावर गर्दी असते. एलईडी दिव्यांनी हा रस्ता उजळून निघाला असला तरी चोरटे सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याने महिलांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकामार्गावरच आदित्यनगरजवळ स्मिता महेश कुलथे या महिलेची १५ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पढल काढला होता. वीस दिवसानंतर ही दुसरी घटना या भागात घडली आहे.

Web Title: Women's gold chains were jolted along the Ashoka Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.