वीरगावच्या शाळेत महिलादिनी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 15:52 IST2020-03-09T15:50:56+5:302020-03-09T15:52:01+5:30

औंदाणे : परिसरातील विरगाव येथील मविप्र संचलित के. बी. एच. माध्यमिक विद्यालय व अभिनव बालविकास मंदिर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

 Women's Day competition at Virgaon school | वीरगावच्या शाळेत महिलादिनी स्पर्धा

वीरगावच्या शाळेत महिलादिनी स्पर्धा

मुख्याध्यापक रामदास भामरे यांच्या हस्ते राजमाता जिजाबाई व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करु न शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मुख्याध्यापक भामरे व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षिकांचा गौरव केला. महिलादिनानिमित्त रांगोळी,चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी पर्यवेक्षक हिंमत भामरे, देवा पवार, महेंद्र सावकार, मिना पाटील, बालेश सावळा, सतीश गांगुर्डे, मिनाक्षी सोनवणे, प्रशांत पाटील, मालती पाटील, प्रविण ठोके, सोनाली देवरे, संध्या गोसावी, सुनिता देवरे, किरण पाटील, संगिता सपकाळे, ज्योती भामरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन रु पाली गांगुर्डे हिने तर आभार साक्षी अहिरे हिने मानले.

Web Title:  Women's Day competition at Virgaon school

टॅग्स :Schoolशाळा