शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महिला, युवावर्गाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:42 IST

Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असताना सायंकाळी मात्र अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असताना सायंकाळी मात्र अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान यंत्रांच्या जवळपास २४२ तक्रारी आल्याने ही यंत्रे तातडीने बदलण्यात आली. जिल्ह्यात युवावर्गासह महिलांचा उत्साह दिसून आला.जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी ४५७९ केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानप्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास सुरू झालेली पावसाची रिमझिम आणि वातावरणातील गारवा यामुळे सकाळी मतदार घराबाहेर पडले नाहीत. दुपारी ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवरील गर्दी वाढत गेली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कळवण मतदारसंघात सर्वाधिक ७६.३५ टक्के, तर नाशिक मध्य मतदारसंघात अवघे ४०.६६ इतक्या मतदानाची नोंद झाली. १७ ठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ३ ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.सकाळच्या पहिल्या काही तासातच अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे अशा ठिकाणी तत्काळ यंत्रे बदलण्यात आल्याने कुठेही मतदानाला अडथळा निर्माण झाला नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. जवळपास सर्वच मतदारसंघांतून यंत्र बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. ३६ बॅलेट युनिट, ३३ कंट्रोल युनिट आणि १७३ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने ही यंत्रे बदलण्यात आली.इगतपुरी मतदारसंघातील एक मतदान केंद्र २५० मीटर दूरवर गेल्याने तेथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र अधिकाऱ्यांनी वेळीच गावकºयांची समजूत काढल्याने मतदान सुरळीत सुरू झाले.वॉररूमची २५६केंद्रांवर टेहाळणीपंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास ४५६ संवेदनशील केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते. या केंद्राच्या टेहळणीतून संशयास्प्द हालचाली प्रकरणी सात जणांवर कारवाई करण्यात आली. वॉररूमच्या माध्यमातून मतदान केंद्रांवरील मतदान कक्ष, वाहनांचे ट्रेकिंग, मतदारांकडून येणाºया तक्रारी आणि आकडेवारीचे संकलन असे चार टप्प्यांत कामकाज करण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक