महिला सदस्यांचा ‘होऊ दे खर्च...

By Admin | Updated: August 6, 2014 02:02 IST2014-08-06T01:36:09+5:302014-08-06T02:02:28+5:30

महिला सदस्यांचा ‘होऊ दे खर्च...

Women members' expense ... | महिला सदस्यांचा ‘होऊ दे खर्च...

महिला सदस्यांचा ‘होऊ दे खर्च...

’नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची मुदत संपण्यास अवघे आठ दिवस शिल्लक असताना, त्यांचा उत्साह वधारला आणि गेले तीन दिवस हे सदस्य गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. कारकीर्द संपताना केलेल्या या दौऱ्याचे नेमके फलित काय होणार? - खर्चापलीकडे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीत नऊ सदस्य असून, सभापतिपदी भाजपाच्या सविता दलवाणी आहेत. वर्षभर या समितीची हालचाल कधीही जाणवली नाही. आता या समितीची मुदत संपणार असून, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी येत्या सोमवारी (दि. ११) समितीच्या नऊ सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलावली आहे. असे असताना समितीच्या नऊपैकी सात सदस्यांनी गुजरात वारी काढली आहे. गेल्या रविवारी हे सदस्य रवाना झाले असून, सुरत, बडोदा, अहमदाबाद या महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाची पाहणी करून धडे घेणार आहेत. या सात सदस्यांबरोबरच जनसंपर्क अधिकारी आणि एक लिपिकही सहभागी झाला आहे.
अभ्यास दौऱ्याविषयी कोणाचा विरोध नसतो; परंतु गेल्याच आठवड्यात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक शहराजवळच गिरणारे येथे सर्व नगरसेवकांसाठंी दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी या सदस्यांनीच नव्हे, तर कोणीही उत्साह दाखविला नव्हता. केवळ तीन नगरसेवक पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचा विचार केला तर १२७ पैकी अवघ्या १२ नगरसेवकांनी हजेरी लावली होती. आणि आता कारकीर्द संपताना हा दौरा झाला आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यावर सुमारे दोन लाख रुपये खर्च होईल असा अंदाज उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women members' expense ...