डिटोनेटर्सच्या स्फोटात महिला जखमी
By Admin | Updated: July 21, 2015 00:26 IST2015-07-21T00:26:14+5:302015-07-21T00:26:46+5:30
नाशिकरोडची घटना : भंगार गोळा करणारीच्या घरात सापडले दोन डिटोनेटर्स

डिटोनेटर्सच्या स्फोटात महिला जखमी
नाशिकरोड : सुभाषरोड पवारवाडी येथील भंगार गोळा करणाऱ्या महिलेने मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी ‘डिटोनेटर्स’ फोडल्याने झालेल्या स्फोटात ती महिला गंभीर जखमी झाली आहे. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली होती.
सुभाषरोड पवारवाडी येथे भंगार गोळा करून विकणारी महिला भिकाबाई म्हसाजी लोखंडे (वय ५५) ही आपल्या तीन मुलांसह एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत राहते. तर उर्वरित दोन मुले वेगळे राहतात. भंगार गोळा करण्यासाठी भिकाबाई लोखंडे हिने गोळा केलेले भंगार घरामध्ये साठवून ठेवले होते. त्यातील भंगार गोळा करताना मिळालेले व स्फोट करण्यासाठी वापरले जाणारे ‘डिटोनेटर्स’ हे सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घेऊन घरापुढील मोकळ्या जागेत एका सीमेंटच्या पाइपजवळ भिकाबाई लोखंडे तांब्याची अथवा इतर धातूची त्यामध्ये तार मिळेल म्हणून फोडत बसली.