शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

साहित्य मेळाव्यात महिला दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:40 IST

साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देसुनंदा पाटील : महिला साहित्य मेळावा

एकलहरे : साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले.शारदा बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित महिला साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा पाटील बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा शारदा गायकवाड, स्वागताध्यक्ष विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले, किशोर पाठक, विद्या फडके, सुनीता मुरकेवार, भीमराव कोते आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनंदा पाटील म्हणाल्या की, अपत्य जन्म व संसारात गुरफटलेल्या स्त्रियांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना व्यक्त होताना संकोचाचा पडदा असतो. त्यामुळे स्त्रियांची लेखणी थांबते. लोकगीतातून स्त्रिया दु:ख, भावना व्यक्त करतात. त्या बोलल्या नाहीत तर त्यांच्या व्यथा समजणारच नाहीत. परंतु, आता स्त्री मोकळी होत आहे. आवड असेल तर सवड मिळते. स्त्रियांनी कथा, कविता, कादंबऱ्या, लेख लिहावेत. स्त्रियांनी घरातील विरोध मोडून आपली ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त केल्यास साहित्यात चांगली भर पडेल. स्त्रियांनी घराच्या मर्यादा ओलांडू नये, परंतु मागेही राहू नये. ज्या गोष्टी मानसिकतेत आहेत तेथे लेखणी चालवावी, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले यांनीही मार्गदर्शन केले. शारदा गायकवाड यांनी प्रास्ताविक तर अंजना भंडारी व सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन अलका कोठावदे यांनी केले.दिवसभर चाललेल्या या संमेलनात गीतमैफल, कविता संमेलन व अन्य कार्यक्रम झाले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच अर्पणा क्षेमकल्याणी, माया दामोदर (शेगाव), सुवर्णा जाधव (मुंबई), सपना नेर, शैलजा करोडे (पुणे), रचना (नगर) यांना यमुनाई पुरस्काराने गौरविण्यात आले. रघुनाथ कोठावदे, रजनी बारसे, अलका कोठावदे, जालिंदर गायकवाड, जयश्री जांभळे, नंदकिशोर ठोंबरे, राजेंद्र चिंतावार, दत्ता दाणी आदींंसह महिला साहित्यिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य