शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

महिलांचा ईदगाहवर ठिय्या: दिल्लीत शाहीनबाग तर नाशकात ‘सादिक बाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 7:03 PM

शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्देरविवारी पुन्हा (दि.२३) महिलांचे ठिय्या आंदोलन‘संविधान के सन्मान में, हम निकले मैदान में

नाशिक : जाती-धर्माच्या भिंती उभारून नागरिकांमध्ये भेदाभेद निर्माण करणारा आणि भारतीय संविधानविरोधी असलेला सीएए कायदा तसेच एनआरसी, एनपीआर या मोहिमा केंद्र सरकारने तत्काळ रद्द कराव्या, या मागणीसाठी दिल्लीच्या ‘शाहीनबाग’च्या धर्तीवर शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर शनिवारी (दि.२२) सकाळपासून महिलांनी ‘संविधान के सन्मान में, हम निकले मैदान में...,’ असे म्हणत एकत्रित येत ‘सादिक बाग’ आंदोलन पुकारले. या आंदोलनात शेकडो बुरखाधारी महिलांनी सहभागी होत सीएए कायद्याविरोधी तीव्र संताप व्यक्त करत निषेधार्थ दिवसभर घोषणाबाजी केली.शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच सीएए, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव एकता समितीच्या वतीने महिलांचे ठिय्या आंदोलनाचे (सादिक बाग) आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्टÑीय सदस्यता नोंदणी अभियान (एनआरसी) याबाबी कोरोना व्हायरसपेक्षाही गंभीर व घातक असल्याचा घनाघाती आरोप ‘सादिक बाग’मधून यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केला. सीएए कायदा सरकारने रद्द करावा, यासाठी संपूर्ण देशभरातून ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे बुलंद होत आहे, मात्र सरकारला अद्यापही जाग येत नसल्याची टीकाही यावेळी महिलांनी केली. ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वारावर महिलांचे ठिय्या आंदोलनाचे फलकासह संविधानाची प्रस्तावना तसेच स्वागत कमान उभारण्यात आली होती. कमानीवर तिरंगा राष्टÑध्वज लावण्यात आला होता. जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, सिडको आदी भागांमधून महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्या महिलांना जेवण, पाणी हे मैदानावर उपलब्ध करून देण्यात आले. तसेच महेबुब-ए-सुब्हानी धर्मार्थ दवाखान्याच्या वतीने आंदोलनाच्या ठिकाणी प्रथमोपचार तपासणी केंद्रही उभारण्यात आले होते. या आंदोलनात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

हे आंदोलन संध्याकाळी ६ वाजता तात्पुरत्या स्वरूपात संपले. रविवारी पुन्हा (दि.२३) सकाळी १० वाजेपासून संध्याकाळपर्यंत महिलांच्या ठिय्या आंदोलनाला प्रारंभ होणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विचारमंचावरून आलेमा सादेका नुरी, आलेमा सायमा बाजी, निलोफर बाजी, निगारमदिना बाजी, परवीन बाजी, जुलेखा बाजी यांनी उपस्थित महिलांना सीएए,एनआरसीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी महिला पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी पुरविण्यात आला होता. 

टॅग्स :Nashikनाशिकcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीMuslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चाShajahaani Eidgahशाहजहांनी इदगाह