Women in the city, smiling at the men's throats | शहरात महिला, पुरूषांच्या गळ्यांना चोरटे देतायेत हिसका

शहरात महिला, पुरूषांच्या गळ्यांना चोरटे देतायेत हिसका

ठळक मुद्देज्येष्ठ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ पुरूषांनाही ‘टार्गेट’ गोपनीय ‘नेटवर्क’ कोलमडले

नाशिक : शहर व परिसरात विविध पोलीस ठाणेनिहाय सुरू असलेली गस्त फोल ठरू लागली आहे. सातत्याने पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळ्या हिसकावून चोरटे पोबारा करू लागल्यामुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील दोन दिवसांत इंदिरानगर, म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घटना मिळून चार सोनसाखळ्या चोरीला गेल्या. चोरट्यांकडून केवळ ज्येष्ठ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ पुरूषांनाही ‘टार्गेट’ केले जात आहे. सर्वाधिक घटना इंदिरानगर, मुंबईनाका, म्हसरूळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडत आहेत.

दहा ते बारा दिवसांपुर्वीच म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत संघवी नक्षत्र इमारतीजवळ चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू होत नाही, तोच पुन्हा चोरट्यांनी म्हसरूळ पोलिसांना आव्हान देत गुरूवारी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास दोन सोनसाखळ्या पुन्हा लांबविल्या. त्याच पध्दतीने चोरट्यांनी इंदिरानगर भागात लागोपाठ दोन दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या सायंकाळी हिसकावून पळ काढला. काही दिवसांपुर्वी मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतदेखील अशाच पध्दतीने सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सर्वाधिक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्यात अद्याप घडल्या आहेत. मुख्यमंत्री मागील महिन्यात दौऱ्यावर असताना चोरट्यांनी इंदिरानगर, मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळ्या लंपास केल्या होत्या. गुरूवारी राष्टÑपती नाशिक दौºयावर आले असतानाही चोरट्यांनी सोनसाखळ्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरल्या. व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चौघांना महिनाभरापुर्वीच बेड्या
मागील महिन्यात गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने संघटितपणे जबरी चोरीचे गुन्हे वारंवार करणाºया चौघांच्या टोळीला बेड्या ठोकल्या होत्या. या चोरट्यांकडून विविध पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे दहा गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून सुमारे २३ तोळे सोन्यासह दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.

गोपनीय ‘नेटवर्क’ कोलमडले
प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्थानिक गुन्हे शोध पथक कार्यान्वित आहे;मात्र या पथकांचे गोपनीय ‘नेटवर्क’ कोलमडले की काय, अशी शंका येते. सोनसाखळी चोरी असो किंवा घरफोडीसारखे गुन्हे असो या गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शोध पथकांना करण्यास अपयश येत असल्याचे मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे.

Web Title: Women in the city, smiling at the men's throats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.