महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 21, 2016 22:53 IST2016-07-21T22:52:49+5:302016-07-21T22:53:27+5:30

महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

The women beat up; Filed the complaint | महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

 नाशिकरोड : शेतात पाणी का सोडले, याबाबत विचारणा करणाऱ्या महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसे नासाका कारखानारोड येथे राहणाऱ्या महिलेने ‘आमच्या शेतामध्ये तुमच्या शेतात साचलेले पावसाचे पाणी का सोडले’ याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने बुधवारी दुपारी १ वाजता कचरू मुरलीधर गायधनी, सुनील कचरू गायधनी, सचिन कचरू गायधनी सर्व रा. पळसे यांनी संबंधित महिलेस फावड्याच्या दांड्याने मारून दुखापत करून विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The women beat up; Filed the complaint