म्हसरूळला महिलेची हजार रुपयांची सोनसाखळी ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:01+5:302021-05-08T04:14:01+5:30
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ...

म्हसरूळला महिलेची हजार रुपयांची सोनसाखळी ओरबाडली
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काल गुरुवारी(दि.६) सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास
घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघा जणांवर गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी कलानगर येथे राहणाऱ्या ज्योती देवीदास परब यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सायंकाळी ज्योती परब कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. कलानगर लेन २ बालाजी चौक मेडिकल जवळून पायी चालत जात असतांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी गाडीचा वेग कमी करून परब यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लाल, निळ्या रंगाचा सदरा परिधान केला होता. या दोघांविरोधात परब यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनातर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. जागोजागी पोलिसांनी नाकाबंदीदेखील केली आहे. मात्र नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने शहरात सोनसाखळी चोरांनी पुन्हा डोकेवर काढले असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे संचारबंदीत सोनसाखळी चोरांचे फावत असल्याने संचारबंदीत सोनसाखळी चोर सुसाट असल्याचे बोलले जात आहे.