शेतात काम करणाऱ्या महिलेचा साप चावल्याने मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:32 IST2019-06-26T22:31:21+5:302019-06-26T22:32:13+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे पतीसोबत शेतीकाम करणार्या मिहलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाडळी घडली.

सुनिता शरद जाधव
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे पतीसोबत शेतीकाम करणार्या मिहलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाडळी घडली.
सुनिता शरद जाधव (२७) असे मयत महिलचे नाव आहे. पती शरद जाधव यांच्या समवेत पाडळी गावालगत असलेल्या आपल्या शेतात टोमॅटोसाठी ड्रीप पसरवण्याचे काम करत होत्या. दोघे एकमेकांपासून सुमारे पन्नास फूट अंतरावर होते.
ट्रिपच्या नळीचा बंडल हातात घेऊन सुनिता बांधाच्या आधाराने उभ्या होत्या. अचानक त्यांना पाठीत काहीतरी चावल्याचे जाणवले. मागे हाताने चाचपडून पाहिल्यावर रक्त लागल्याचे पाहून त्या मोठ्याने ओरडल्या व बेशुद्ध होऊन खाली पडल्या. पती शरद याचेसह बाजूच्या शेतामध्ये काम करणाºया शेतकऱ्यांनी धाव घेतली. त्यांच्या पाठीवरून रक्त येत होते व साप चावल्याच्या खुणा पाहिल्यावर मदतीला धावलेल्या शेतकºयांनी सुनीताला तातडीने ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले.
सर्पदंशाची जखम मोठी असल्याने प्रथमोपचार करून येथील कर्मचाºयांनी पुढील उपचारासाठी सुनीता यांना नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तातडीने खाजगी वाहनातून तिला नाशिकरोडकडे रवाना करण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नाशिक जिल्हा रु ग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा पाडळी येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत सविता यांच्या पश्चात पती, सासू , सासरा व दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
(फोटो २६ सविता जाधव)