क्रेनखाली चिरडून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:33+5:302021-06-26T04:11:33+5:30
नाशिक : मुंबई नाका भागातील युनिटी कॉम्प्लेक्ससमोर पायी जाणाऱ्या महिलेला क्रेनने धडत दिल्याने क्रेनखाली चिरडून महिलेचा ठार झाली. ...

क्रेनखाली चिरडून महिला ठार
नाशिक : मुंबई नाका भागातील युनिटी कॉम्प्लेक्ससमोर पायी जाणाऱ्या महिलेला क्रेनने धडत दिल्याने क्रेनखाली चिरडून महिलेचा ठार झाली. पोलिसांनी संशयित क्रेनचालकास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिन शौकत इनामदार (३८, रा. लक्ष्मी नारायण अरार्टमेंट, पाखाल रोड) या मुंबई नाका सर्कल येथून पायी जात असताना युनिटी कॉम्प्लेक्ससमोर क्रेन (क्र. एमएच १५ सीव्ही २३५५) चा चालक कैलाशनाथ रामनरेश शुक्ला याने निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत क्रेन चालवित त्यांना धडक दिली. त्यामुळे शाहीन क्रेनच्या चाकाखाली आल्या. यात त्यांचा चिरडून मृत्यू झाला. त्यांचे पती शौकत रशिद इनामदार (४५ ) यांनी दिलेल्या फर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात क्रेनचालक कैलाशनाथ शुक्ला (४०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.