महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:32 IST2018-11-14T01:32:08+5:302018-11-14T01:32:27+5:30

हिरावाडी रोडवरील पायी जात असलेल्या आशा बागुलया महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना घडली़

The woman threw a tie in the throat | महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

पंचवटी : हिरावाडी रोडवरील कपील बंगल्याजवळून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पायी जात असलेल्या आशा बागुल (रा़ शिवकृपा अपार्टमेंट, महालक्ष्मीनगर) या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़८) सुमारास घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
टोळक्याकडून तरुणांना मारहाण
इंदिरानगर : जुन्या भांडणाची कुरापत काढून मेडिकल दुकानाजवळ उभ्या असलेल्या दोघा तरुणांना टोळक्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: The woman threw a tie in the throat