महिलेची गळ्यातील सोनसाखळी खेचली

By Admin | Updated: July 19, 2016 01:17 IST2016-07-19T01:09:40+5:302016-07-19T01:17:57+5:30

महिलेची गळ्यातील सोनसाखळी खेचली

The woman threw a napkin in her throat | महिलेची गळ्यातील सोनसाखळी खेचली

महिलेची गळ्यातील सोनसाखळी खेचली

 नाशिक : रविवार कारंजाकडे सासूसमवेत पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़१८) पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकस्तंभावरील घारपुरे घाट परिसरात राहणाऱ्या सोनाली दिगंबर पालखेडे या आपल्या सासूसमवेत अशोकस्तंभावरून रविवार कारंजाकडे पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या संशयिताने पालखेडे यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून नेली़
रविवार कारंजा परिसरात भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The woman threw a napkin in her throat