शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा आवळून खून, आरोपी पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 10:03 IST

दोन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता त्यांना अडीच महिन्यांची मुलगी असून संशयित

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठरोडवर असलेल्या इंद्रप्रस्थनगरी येथे पतीने पत्नीचा कशाने तरी गळा आवळून खून केल्याची घटना काल बुधवारी (दि.26) रात्री साडे अकरा वाजता घडली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर संशयित आरोपी पतीने स्वतःच्या हातावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चैताली सुनिल बावा (23) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचा नाव आहे. काल मयत चैताली व तिचा पती सुनिल या दोघांत काहीतरी कारणावरून वाद झाले होते त्यातूनच पती सुनिल याने कशाच्या तरी सहाय्याने पत्नी चैतालीचा गळा आवळून खून केला. 

दोन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता त्यांना अडीच महिन्यांची मुलगी असून संशयित आरोपी पती सुनिल बावा (30) हा सैन्यदलात नोकरीला असून त्याची नेमणूक श्रीनगरला आहे. विशेष म्हणजे तो दहा दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता. पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपीने त्याचा कल्याण येथे राहणारा  चुलत भाऊ किशोर भारती याला फोन केला. त्यावेळी भारती याने वहिनी कुठे आहे विचारले असता आरोपी बावा याने ती स्वर्गात गेली असे सांगितले. त्यावेळी  चुलत भाऊ असलेल्या भारती याला संशय आल्याने व त्याने लागलीच त्या मुलीचे सिडको येथे राहणारे वडील प्रकाश बावा यांना माहिती कळविली व काही वेळाने ते पेठरोडला इंद्रप्रस्थनगरी येथे दाखल झाले. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता सुनिल याने दरवाजा उघडला नाही. मग त्यांनी जोरजोरात आवाज दिल्यानंतर त्याने दरवाजा उघडला त्यावेळी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळविली आणि काही वेळाने म्हसरूळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित बावा यास ताब्यात घेतले. घरात चैताली जमिनीवर पडलेली होती तर सुनिल याने हातावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने घरात जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनDeathमृत्यू