महिलेचा ताबा सुटला अन् कारच्या कोलांटउड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 11:11 PM2022-03-15T23:11:10+5:302022-03-15T23:12:17+5:30

नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनासमोरून कॅनडा कॉर्नरकडे मार्गस्थ होताना महिला कारचालकाचा ताबा सुटल्याने मारुती सेलेरिओ कारने (एम.एच.१५ ईपी ४१५१) कोलांटउड्या घेतल्या. दरम्यान, मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कारचालक महिला व दुचाकीस्वार बालंबाल बचावले. अपघात इतका विचित्र होता की, कार मुख्य रस्त्यावरून व्यापारी संकुलाच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन उलटली.

Woman loses control of Ankara's Kolantudya! | महिलेचा ताबा सुटला अन् कारच्या कोलांटउड्या!

महिलेचा ताबा सुटला अन् कारच्या कोलांटउड्या!

Next
ठळक मुद्देशरणपूर रोड : महिला कारचालकासह दुचाकीस्वार बालंबाल बचावले

नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनासमोरून कॅनडा कॉर्नरकडे मार्गस्थ होताना महिला कारचालकाचा ताबा सुटल्याने मारुती सेलेरिओ कारने (एम.एच.१५ ईपी ४१५१) कोलांटउड्या घेतल्या. दरम्यान, मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कारचालक महिला व दुचाकीस्वार बालंबाल बचावले. अपघात इतका विचित्र होता की, कार मुख्य रस्त्यावरून व्यापारी संकुलाच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन उलटली.

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि.१५) संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एका महिला कारचालकाने तिच्या ताब्यातील कार येथील एका बँकेसमोरून सुरू केली आणि कॅनडा कॉर्नरकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून वळविली. यावेळी कारचालक महिलेने कार पुढे मार्गस्थ केली असता अचानकपणे कारचा वेग वाढला आणि त्यामुळे महिला चालकाची भंबेरी उडाली. कारला थांबवण्याच्या प्रयत्नात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडला आणि वेग अजूनच वाढला. यामुळे गोंधळून गेलेल्या महिला चालकाने कारचा हॅन्ड ब्रेक ओढला आणि कारने कोलांटउड्या घेतल्या. येथील स्टेट बँकेच्या शेजारील व्यापारी संकुलातील वाहनतळात जाणाऱ्या रस्त्यावर कार जाऊन उलटली. दरम्यान, एका मोपेड दुचाकीला (एम.एच.१५एफ.एस ३२९०) धडक बसली. यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याने डोके सुरक्षित राहिले; मात्र पायाला गंभीर मार लागला. तसेच महिलेलाही किरकोळ मार लागला. प्रसंगावधान राखल्याने या विचित्र अपघातात जीवितहानी टळली. तसेच संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळदेखील अधिक होती. यामुळे अन्य वाहनांना धडक बसण्याचा धोका निर्माण होऊन मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महिला कारचालकासह जखमींची नावे समजू शकलेली नाही.

पोलिसांची तत्परता अन् बघ्यांची गर्दी
कार विचित्र पद्धतीने उलटल्याने त्याभोवती बघ्यांनी गर्दी केली होती. रस्त्याने ये-जा करणारे वाहनचालकांनीही वाहने थांबविल्याने वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची झालेली गर्दी पोलिसांनी पांगविली आणि त्यामुळे खोळंबलेली वाहतूकही सुरळीत केली. तसेच जखमी युवकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळील खासगी रुग्णालयात पोलिसांनी प्रथमोपचाराकरिता हलविले.

Web Title: Woman loses control of Ankara's Kolantudya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.