दुचाकीच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:14 IST2021-01-21T04:14:01+5:302021-01-21T04:14:01+5:30

----------------------------- मालाची परस्पर विक्री करून साडेनऊ लाखांचा अपहार मालेगाव : शहरातील अन्सार प्रेस येथून गाठ, कापड व कच्चा ...

Woman killed in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत महिला ठार

दुचाकीच्या धडकेत महिला ठार

-----------------------------

मालाची परस्पर विक्री करून साडेनऊ लाखांचा अपहार

मालेगाव : शहरातील अन्सार प्रेस येथून गाठ, कापड व कच्चा माल संबंधित कंपनीकडे न पाठवता त्या मालाची परस्पर विल्हेवाट लावून ९ लाख ४८ हजार ३६७ रुपयांचा अपहार करणाऱ्या दोघांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रफिक अहमद मोहम्मद लुकमान अन्सारी यांनी फिर्याद दिली आहे. हबिबूर रहेमान फजलूर रहेमान यांनी ८ लाख ७० हजार रुपयांच्या ५४ गाठी व कच्चे कापड संबंधित कंपनीकडे न पाठवता, त्या मालाची परस्पर विक्री केली. तसेच रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी नोंदवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. आर. देशमुख, शेख करत आहेत.

Web Title: Woman killed in two-wheeler collision