कारच्या धडकेत महिला ठार

By Admin | Updated: December 26, 2015 00:01 IST2015-12-25T23:59:30+5:302015-12-26T00:01:53+5:30

कारच्या धडकेत महिला ठार

Woman killed in car crash | कारच्या धडकेत महिला ठार

कारच्या धडकेत महिला ठार

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत सुरगाणा तालुक्यातील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२४) आडगावमध्ये घडली आहे़ मयत महिलेचे नाव रंजना शंकर कडाळे (२५) असे असून, त्या गोपाळपाडा येथील रहिवासी आहेत़ आडगाव येथील दत्तमंदिरासमोरील जात असताना भरधाव आलेल्या कारने (एमएच ४१ व्ही ५५९९)ने त्यांना जबर धडक दिली़ या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कडाळे यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी राजाराम माळोदे
(रा. आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी कारचालक दिलीप दळवी (४८, रा. लखमापूर, ता. सटाणा) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Woman killed in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.