शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुचाकी घसरल्याने युवती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:52 AM

इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे जण नाशिकला परतत येत असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक युवतीचा जागीच मृत्यू, तर तेरा वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सायंकाळी माणिकखांबजवळ घडली़

नाशिक : इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे जण नाशिकला परतत येत असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक युवतीचा जागीच मृत्यू, तर तेरा वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सायंकाळी माणिकखांबजवळ घडली़ ऋतुजा दीपक अरसुळे (२१, रा़ चर्मकार लेन, आझार चौक) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघाताची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़जुने नाशिकमधील आझाद चौकातील रहिवासी दीपक वसंत अरसुळे हे रविवारी सकाळी पत्नी, मुलगी ऋतुजा व मुलगा जीवन यांच्यासह इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी गेले होते़ दीपक हे पत्नीसह स्प्लेंडर दुचाकीवर तर मुलगी ऋतुजा व जीवन हे दोघे अ‍ॅक्टिवा दुचाकीवर होते़  सायंकाळी नाशिकला परतत असताना मुंबई महामार्गावर घोटीच्यापुढे माणिकखांब गावापासून काही अंतरावरील वळणावर ऋतुजा हिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी स्लीप झाली़ यामध्ये तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या पाठिमागे बसलेला भाऊ जीवन याच्या हाताला फॅक्चर झाले़  या अपघातानंतर दीपक अरसुळे यांनी तत्काळ ऋतुजाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषीत केले तर जखमी जीवनवर उपचार सुरू आहेत़ या घटनेनंतर अरसळे दाम्पत्याने रुग्णालयातच टाहो फोडला होता़ सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे दीपक अरसुळे यांची मुलगी ऋतुजा ही उच्च शिक्षण घेत होती़ या अपघाताची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़अरसुळे कुटुंबीय दुचाकीने गेले होते पर्यटनालाअरसुळे कुटूंबीय हे इगतपुरी येथे फिरण्यासाठी गेले होते.दीपक हे पत्नीसह स्प्लेंडर दुचाकीवर, तर मुलगी ऋतुजा व मुलगा जीवन हे दोघे अ‍ॅक्टिवा दुचाकीवर होते़ सायंकाळी नाशिकला परतत असताना माणिकखांब जवळ ऋतुजा हिची दुचाकी स्लीप झाली़ यामध्ये तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या पाठीमागे बसलेला भाऊ जीवन याच्या हाताला फॅक्चर झाले़

टॅग्स :Accidentअपघात