शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

MIDCतील महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून; सुपरवायझरनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:53 IST

एकाच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कंपनीच्या कंपाउंडमध्ये सोमवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. तर याच कंपनीतील एका कर्मचाऱ्याने गोंदे येथील आपल्या गावी गळफास लावून आत्महत्या केल्याचेही समोर आल्याने या घटनेमागचे गूढ वाढले आहे. या दोन्ही घटनांचा आपसात काही संबंध आहे का? याचा पोलिस शोध घेत आहेत.

शिल्पा अशोक पवार (२८, रा. मापरवाडी, ता. सिन्नर) असे मृत महिलेचे नाव आहे. यासंदर्भात मयत शिल्पा पवार हिचा दीर गुलाब लक्ष्मण पवार (३०) याने मुसळगाव एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीने आपल्या वहिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची फिर्याद दिली आहे. कंपनीत मयत पवार या कंत्राटी पद्धतीने कामावर होत्या, असे समजते. सदर महिला ही माळी काम करीत होती. खून होण्यापूर्वी त्या सुरक्षारक्षक कॅबिनच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे दिसून आल्या होत्या. पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरवडकर करीत आहेत.

सुपरवायझरने आपल्या गावी घेतला गळफासमहेंद्र सखाहरी रणशेवरे (४८, रा. गोंदे, ता. सिन्नर) हे याच माळेगाव येथील एका कंपनीत कामाला होता. त्याने गोंदे (ता. सिन्नर) येथे आपल्या गावी जाऊन शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दोघेही माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर होते. रणशवरे तेथे सुपरवायझर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. रणशेवरे याची कारखान्यात आल्याची एन्ट्री आहे. मात्र, बाहेर गेल्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रणशवरे यांच्या मृत्यूप्रकरणी वावी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी