शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

ट्रकच्या चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:50 IST

नाशिक - पुणे महामार्गावरील चेहेडीजवळ मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने दुचाकीवरून मार्गस्थ होणारे मायलेक दुचाकी घसरून खाली कोसळले. याचवेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात मुलगा बालंबाल बचावला.

ठळक मुद्देसुदैवाने मुलगा बचावला

नाशिकरोड : नाशिक - पुणे महामार्गावरील चेहेडीजवळ मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने दुचाकीवरून मार्गस्थ होणारे मायलेक दुचाकी घसरून खाली कोसळले. याचवेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात मुलगा बालंबाल बचावला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर येथील शिवाजीनगर कॉलनीमध्ये राहणारे आदेश अशोक उगले (२२) हे त्यांच्या आई अभिलाषा अशोक उगले (४७) यांना सोबत घेऊन ड्रीम युगा दुचाकीवरून (एमएच १५ ईसी ६७२८) नाशिकरोडकडे येत होते. यावेळी चेहेडी पंपिंग प्राइड इमारतीसमोर मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि खड्डे पडलेले असल्याने गाळामुळे आदेश यांची दुचाकी घसरली. यावेळी दोघेही मायलेक खाली कोसळले. आदेश यांनीही हेल्मेट परिधान केलेले होते; मात्र त्यांच्या आईच्या डोक्यात हेल्मेट नव्हते.याचवेळी सिन्नर बाजूने नाशिककडे ट्रकचालक सुरेश अशोक कुमटकर (रा. धोंडपारगाव, जामखेड) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच १२ एनएक्स ५६९९) भरधाव वेगाने चालवत असताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याच्या ट्रकच्या चाकाखाली आदेश यांच्या आई अभिलाषा सापडून गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तेथील लोकांनी टेम्पोतून जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. आदेश यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक सुरेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिलाषा या जिल्हा व सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस होत्या. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू