शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:44 IST2018-06-27T22:43:35+5:302018-06-27T22:44:04+5:30
मुंजवाड : पाच दिवसांपूर्वी मुंबई -आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार झाले होते. त्या अपघातातील जखमी मुंजवाड येथील महिला मोहिनी विनायक मोरे (३२) यांचे नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ७ वाजता निधन झाले.

शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन
मुंजवाड : पाच दिवसांपूर्वी मुंबई -आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार झाले होते. त्या अपघातातील जखमी मुंजवाड येथील महिला मोहिनी विनायक मोरे (३२) यांचे नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे शिरवाडे अपघातातील जखमी महिलेचे निधन.
किकवारी येथील वºहाडींना नाशिक येथे विवाहासाठी घेऊन जाणाऱ्या कू्रझर गाडीचा अपघात झाला होता. यात किकवारी येथील उद्योजक केदा बापू काकुळते यांच्या पत्नी धनूबाई काकुळते यांच्यासह चार महिला, मुंजवाड येथील एक महिला व मुलगी, डांगसौंदाणे येथील महिलेसह कळवणच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या अपघातात मोहिनी मोरे या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने मुंजवाड, किकवारी गावावर शोककळा पसरली आहे.आई, मुलगी, नातींचा मृत्यू
या भीषण अपघातात ठार झालेल्या किकवारी येथील कृष्णाबाई बाळू शिंदे यांची मोेहिनी विनायक मोरे ही मुलगी असून, तेजश्री साहेबराव शिंदे व उर्वशी विनायक मोरे या नाती आहेत.
ै..अन् आईचा अंत्यविधी
अपघातात जीव गमावलेली छोटीशी बालिका उर्वशी विनायक मोरे हिचा बुधवारी (दि. २७) पंचक्रि येचा कार्यक्रम होता, तो झाल्यानंतर तिची आई मोहिनी विनायक मोरे यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.