किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:21 IST2020-10-17T22:45:52+5:302020-10-18T00:21:30+5:30
मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी येथे शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, तर दुसºयाया घटनेत लहान ...

किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू
मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी येथे शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, तर दुसºयाया घटनेत लहान मुलांवरुन झालेल्या भांडणावरु न मारहाणीत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या तीन तासांतच दोन्ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओवाडी नाला येथे मागील भांडणाची कुरापत काढून मुदस्सीर नावाच्या तरु णाने गोळीबार केला. या घटनेत शेख इब्राहिम शेख इब्राहिम (४०) यांच्या हाताला गोळी लागल्याने जखमी झाले.गुफरानशेख यास उपचारार्थ खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले असुन रात्री उशिरा त्याच्या हातावर शस्त्रक्रि या करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी उप अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक शकिल शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली,व रु ग्णालयात जाणुन जखमी गुफरानशी अधिक माहिती घेतली.याबाबत जखमीचा जाबजबाब घेऊन तक्र ार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारीच दुसरी घटना पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली-बाग येथे लहान मुलांवरु न झालेल्या भांडणावरु न तीन महिलांनी एका महिलेला लाकडी दांडक्याने डोक्यात मारु न व गळा दाबल्याने आमना अब्दुल सत्तार मलिक (४०)रा.अलीबाग हिचा जागीच मृत्यू झाला.सदर प्रकार रात्री आठच्या सुमारास घडला.यावेळी पवारवाडी पोलीस पिहल्या घटनेच्या जाबजबाबसाठी रु ग्णालयात होते.तोच पुन्हा महिलेने महिलेचा खुन केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रु ग्णालयात पाठविला.घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान या प्रकरणात नाझमीन,रेश्मा, नसरीन (पूर्ण नाव माहित नाही) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.