दुचाकी वरून पडल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:45 IST2021-01-20T22:21:08+5:302021-01-21T00:45:57+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील महिलेचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि २०) दुपारी ४ वाजता सटाणा ताहाराबाद रस्त्यावर शासकीय विश्राम गृहाजवळ घडली. कल्पना अजय बोरसे असे मृत महिलेचे नाव आहे.

दुचाकी वरून पडल्याने महिलेचा मृत्यू
सटाणा : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील महिलेचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि २०) दुपारी ४ वाजता सटाणा ताहाराबाद रस्त्यावर शासकीय विश्राम गृहाजवळ घडली. कल्पना अजय बोरसे असे मृत महिलेचे नाव आहे.
तिळवण येथील अजय पुंडलिक बोरसे हे सटाण्यात एका विवाह समारंभाला भेट देण्यासाठी आले असता विवाह समारंभ आटोपून आपल्या दुचाकीवरून घरी परत जात असताना सटाणा ताहाराबाद रस्त्यावर शासकीय विश्राम गृहा जवळ अचानक कल्पना यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. पाठीमागून येत असलेल्या माल वाहतूक कंटेनरने त्यांना चिरडले.अपघात घडल्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी कल्पना यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी कल्पना यांचा मृत्य झाल्याचे घोषित केले.