आडगावला महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:03 IST2019-03-19T23:22:25+5:302019-03-20T01:03:33+5:30
नांदूर गावात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने नांदूर अमरधाम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आडगावला महिलेची आत्महत्या
पंचवटी : नांदूर गावात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने नांदूर अमरधाम येथील गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यमुना शंकर काळे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून, तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूर गावात यमुना काळे या कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. मात्र रविवारी (दि.१७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी नांदूर गाव अमरधामसमोर असलेल्या गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नदीपात्रात त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.