सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:35+5:302021-06-26T04:11:35+5:30
नाशिक : सासरच्यांनी मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप करीत पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड ...

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
नाशिक : सासरच्यांनी मुलीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप करीत पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात मुलीच्या सासू, सासरे दीर व पतीविरोधात फिर्याद दिली असून, पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, पिडित मुलीच्या वडिलांनी तिच्या सासरच्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पीडित ही थायरॉईड आजारामुळे गर्भवती राहू शकत नाही, असा गैरसमज करून घेत, सासरच्यांनी तिला वांझपणाचे टोमणे दिले, तसेच स्वयंपाक करता येत नसल्याचेही टोमणे दिले. सासूने तिला मारून घरकाम करताना जाणून बुजून जास्त कामाचा बोजा देऊन पतीपासून दूर ठेवण्याची वागणूक दिली. त्यामुळे तिच्या मनाची घुसमट होऊन, या सर्व घटनांचा पीडितेच्या मनावर आघात होईल, अशी वागणूक देत, तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पिडितेचे सासरे एकनाथ विठ्ठल शिंदे, सासू सीमा एकनाथ शिंदे, पती अमित एकनाथ शिंदे व दिर सुमीत एकनाथ शिंदे यांंच्याविरोधात पीडितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.