नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच महिला सभापती; कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड
By संजय पाठक | Updated: March 19, 2025 12:18 IST2025-03-19T12:18:33+5:302025-03-19T12:18:59+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ७२ वर्षांनी इतिहास

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच महिला सभापती; कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड
संदीप झिरवाळ, नाशिक : माजी खासदार तसेच बाजारसमिती माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आज घेण्यात आलेल्या बाजारसमिती सभापतीपदी निवडणुकीत कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चुंभळे यांच्या रूपाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिल्यांदा महिला सभापतीपद प्राप्त झाले आहे.
बुधवारी सकाळी माजी सभापती देविदास पिंगळे यांनी मी निवडून आणलेल्या संचालकांनी गद्दारी केल्याचा आरोप करत सभेवर बहिष्कार टाकला. चुंभळे यांच्या रूपाने बाजारसमितीच्या ७२ वर्षांच्या कारकिर्दीत पहिली महिला सभापती झाली आहे. १५ सदस्य संख्याबळ चुंभळे यांच्याकडे असल्याने त्या सभापती पदाच्या मानकरी ठरल्या आहेत.