शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

घरभाडे न दिल्याने महिलेची जाळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:45 IST

शहरातील भारतनगर भागात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने थेट भाडेकरू महिलेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पीडित महिलेच्या मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबाने गुरुवारी (दि.२) समोर आला.

ठळक मुद्देभारतनगर येथील प्रकार : चार जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

नाशिक : शहरातील भारतनगर भागात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने थेट भाडेकरू महिलेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पीडित महिलेच्या मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबाने गुरुवारी (दि.२) समोर आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी घरमालकासह त्याच्या संशयित साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच गोरगरिबांच्या रोजीरोटीवर गंडांतर आले आहे. त्यामुळे शासनाने घरभाडे वसुलीला मनाई केली असताना हा प्रकार घडला आहे, हे विशेष होय.वडाळारोडवरील भारतनगर भागात राहणाऱ्या आयेशा असीम शेख (वय १८) या महिलेला भाजलेल्या गंभीर अवस्थेत मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बुधवारी (दि.१) आयेशाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांनी महिलेचा जबाब घेतला. जबाबानुसार मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संशयित बब्बू (पूर्ण नाव नाही), अश्पाक शेख (३२, रा. शिवाजीवाडी), राणी व अमन (पूर्ण नावे नाहीत) यांनी घरभाडे दिले नाही म्हणून रॉकेल ओतून पेटवून दिले, असे म्हटले आहे. या जबाबानुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरमालकासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी संशयित अश्पाक व शाहिस्ता उर्फ राणी शेख या दोघांना अटक केली आहे. न्यायालयानेशुक्र वारपर्यंत (दि.३) पोलीस कोठडी सुनावली आहे.पतीचा मात्र वेगळाच जबाबपोलीस तपासात परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार आणि मयत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार आयेशाने स्वत:च अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचे समोर येत आहे.४घटनेच्या दिवशी महिलेचे तिच्या पतीसोबत वाद झाले. त्यावेळी घरमालक तेथे आला, त्याचवेळी तिने स्वत:स पेटवून घेतल्याचे प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस सूत्रांनीसांगितले.खुनाचा गुन्हा; मात्र साशंकता कायममृत्युपूर्व जबाबात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने पेटविल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सुरुवातीला संशयितांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला; मात्र बुधवारी जळीत महिलेचाच मृत्यू झाल्याने या गुन्ह्याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले; मात्र अद्यापही पोलिसांसमोर महिलेचा मृत्यू की आत्महत्या याबाबतचा पेच कायम आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी