शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 02:05 IST

लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस अधिक उपचारासाठी रविवारी (दि. १६) पहाटे मुंबईच्या मसीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

ठळक मुद्देपीडितेची प्रकृती स्थिर : उपचारासाठी मुंबईस हलविले

नाशिक/लासलगाव : लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस अधिक उपचारासाठी रविवारी (दि. १६) पहाटे मुंबईच्या मसीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.लासलगाव बसस्थानकाच्या आवारात लग्नाच्या वादातून शनिवारी महिला व संशयितांमध्ये झालेल्या झटापटीत अंगावर पेट्रोल सांडल्याने महिला ६७ टक्के भाजली होती. तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंगणघाट येथील घटनेनंतर लासलगावमध्ये घडलेल्या जळीत प्रकरणामुळे नागरिकात हळहळ व संतापही व्यक्त करण्यात आला. घटनेनंतर तत्काळ ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळावरून फरार झालेल्या दोघा संशयितांना काही तासांत ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवल्यामधून रविवारी सकाळी ताब्यात घेतले. सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह रजेवर असताना सदर प्रकार समजताच त्या माघारी परतल्या व रात्री उशीरापर्यंत घटनेवर नियंत्रण ठेवून होत्या. रात्री पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय रूग्णालयाला भेट देऊन पीडितेच्या तब्येतीविषयी विचारपूस केली.दरम्यान, शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत पीडितेच्या प्रकृतीविषयी विचारपूस करून धीर दिला. त्यानंतर ठाकरे यांनी पीडितेची प्रकृती स्थिर होताच तिला अधिक औषधोपचारासाठी मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला होता. यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी निर्णय घेत पीडितेला पुढील उपचारासाठी पहाटे विशेष रुग्णवाहिकेतून डॉक्टरांच्या पथकासह मुंबईच्या मसिना रुग्णालयात हलविले. दरम्यान, पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ही सकारात्मक बाब असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. त्यानंतर पीडितेचा भाऊ मुंबईला रवाना झाला आहे.चौकशीनंतर दोघांना सोडलेलासलगाव येथील महिला जळीत प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या दोघांना रविवारी पोलिसांनी सोडून दिले. या प्रकरणातील मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फबाला मधुकर भागवत यास ताब्यात घेतल्यावर यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेले दत्तू बाळा जाधव व नीलेश पद्माकर केंदळे यांना रविवारी सायंकाळी चौकशीनंतर सोडून दिले.पेट्रोल पंप व्यवस्थापकासह कर्मचाऱ्याविरु द्ध गुन्हामहिलेस बाटलीत पेट्रोल विक्र ी केल्याप्रकरणी पोलिसांनी लासलगाव येथील गुंजाळ पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकासह कर्मचारी सागर आकाश शिंदे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकावर येण्यापूर्वी महिलेने या पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल भरून घेत ते अंगावर ओतून घेतले होते. बाटलीत पेट्रोल देण्यास कायद्याने मनाई असताना महिलेस बाटलीमध्ये पेट्रोल दिल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गंभीर दखल घेतली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक