साक्षी, प्रियंकाची चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:19 PM2019-11-14T23:19:08+5:302019-11-14T23:23:10+5:30

सिन्नर : महाराष्टÑ संघातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या सिन्नरच्या खेळाडू साक्षी कानडी व प्रियंका घोडके यांच्या अर्धशतकी तडाखेबंद खेळीमुळे महाराष्टÑाच्या संघाने सिक्कीमच्या संघावर मोठा विजय मिळविला. सिन्नरच्या या दोन्ही महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Witness, Priyanka's brilliant performance | साक्षी, प्रियंकाची चमकदार कामगिरी

साक्षी कानडी

Next
ठळक मुद्देटी-२० : पहिल्या सामन्यात महाराष्टÑाची सिक्कीमवर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : महाराष्टÑ संघातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या सिन्नरच्या खेळाडू साक्षी कानडी व प्रियंका घोडके यांच्या अर्धशतकी तडाखेबंद खेळीमुळे महाराष्टÑाच्या संघाने सिक्कीमच्या संघावर मोठा विजय मिळविला. सिन्नरच्या या दोन्ही महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पाँडिचेरी येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत सिन्नरच्या साक्षी कानडी आणि प्रियंका घोडके या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली, तर सिन्नरच्याच माया सोनवणे हिने चार षटकांत केवळ २० धावा देऊन एक बळी घेतला. त्यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने सिक्कीमवर १०८ धावांनी दणदणीत विजय मिळविला.
माया सोनवणे, प्रियंका घोडके व साक्षी कानडी या सिन्नरच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्र्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे महिलांसाठी टी-२० सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. माया सोनवणेची मागील वर्षीदेखील या संघात निवड झाली होती.
मंगळवारी (दि. १२) सिक्कीम आणि महाराष्ट्र यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या साक्षी कानडी हिने ५० चेंडूत ७६ धावा ठोकल्या, तर प्रियंका घोडके हिने संयमी खेळी करताना ५९ चेंडूत ६१ धावा कुटल्या. दोन विकेटच्या बदल्यात महाराष्ट्राने २० षटकांत १८० धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात सिक्कीम संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. २० षटकांत ९ गड्यांच्या बदल्यात त्यांना अवघ्या ७२ धावा करता आल्या. माया सोनवणे हिने चार षटकात २० धावा देत एक गडी बाद केला. सिन्नरच्या या महिला खेळाडूंच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. माया सोनवणे, प्रियंका घोडके व साक्षी कानडी या सिन्नरच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्र्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे महिलांसाठी टी-२० सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. माया सोनवणेची मागील वर्षीदेखील निवड झाली होती.

 

Web Title: Witness, Priyanka's brilliant performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.