वीस मिनिटांत दोन मंगळसुत्र ओरबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 14:34 IST2017-08-02T14:24:17+5:302017-08-02T14:34:22+5:30
नाशिकरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी मुंबईनाका व पंचवटी परिसरात पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेने पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.

वीस मिनिटांत दोन मंगळसुत्र ओरबाडले
नाशिक : नाशिकरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आत दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी मुंबईनाका व पंचवटी परिसरात पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेने पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.
शहरात सातत्याने होणारी नाकाबंदी, वाहतूक पोलिसांकडून वसूल केला जाणारा दंड, गुन्हे शाखेकडून सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या जाणाºया मुसक्या अशा कारवाया सुरू असतानाही सोनसाखळी चोरट्यांचे धाडस अद्याप कमी झालेले नाही. बुधवारी (दि.२) कालिका मंदीरासमोरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. सदर घटनेला अवघे पंधरा ते वीस मिनिटांमध्येच पंचवटी परिसरात अशाच पध्दतीचे चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबाडल्याचे उघडकीस आले. दोन्ही घटना सकाळी सात ते सव्वा सात वाजेच्या दरम्यान घडल्या. विशेष म्हणजे सकाळच्या सुमरास रस्त्यांवर फारशी वर्दळ नसतानाही हे चोरटे पोलिसांना मिळून आले नाही. सर्वत्र नाकाबंदी केली गेली तरीही सोनसाखळी चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. कालिका मंदिरात दर्शनासाठी आलेल्या माधुरी त्र्यंबक देशपांडे (६३) या वृध्देच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी ओरबाडून पळ काढला. सदर घटनेने देशपांडे या घाबरल्या. परिसरातील नागरिकांच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांनी बाजूला घेत धीर देत सावरण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. दुसरी घटना पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पंचवटीच्या अष्टविनायकनगरमधील गणपती मंदिराजवळ घडली. कुसुम काशिनाथ मंडलिक (५२) या पायी घराकडे जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र अशाच पध्दतीने चोरट्यांनी हिसकावून पळ काढला.