शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंढेंवर 'विश्वास', अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 09:07 IST

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द होण्याची चिन्ह आहेत. 

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द होण्याची चिन्ह आहेत. कारण,खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घ्या, असा आदेश दिला आहे. त्यानुसार उद्या होणार्‍या महासभेत अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे नाशिक भाजपामध्ये खळबळ उडाली असून भाजपा नगरसेवकांना दणका मिळाला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाबाबत शनिवारी (1 सप्टेंबर)  विशेष महासभा घेण्यात येणार होती. मात्र तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुंढेंवर विश्वास दाखवत त्यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. 

तुकाराम मुंढेंची नरमाईची भूमिका

दरम्यान, महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर अखेर मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द करतानाच नवीन वार्षिक भाडेमूल्य आकारणीत केलेली सुमारे तिप्पट वाढ पन्नास टक्क्यांनी मागे घेतली आहे. गुरुवारी (30 ऑगस्ट) महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंढे यांनी आपल्या ३१ मार्च रोजीच्या अधिसूचनेत शुद्धीपत्रक काढण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दरवाढ मागे घेतल्याचे सांगितले.

(नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांना दणका)

आयुक्त मुंढे यांनी बजावली भाजपा आमदारास नोटीसमहापालिकेच्या इमारतीचा विनाभाडे वापर केल्याबद्दल भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावली. साडेपाच लाख रुपये भाडे आणि अधिक 18 टक्के व्याज तातडीने भरावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. पंचवटीतील गणेशवाडी येथे मनपाने उभारलेल्या विद्या भवन इमारतीत आमदार सानप यांच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळामार्फत वाचनालय व अभ्यासिका चालवली जाते. 550.40 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या जागेसाठी अवघे पाचशे रुपये शुल्क असताना आमदार सानप यांनी 11 सप्टेंबर 2001 पासून ते भरलेले नाही. महापालिका अधिनियमातील कलम 79 (ड) नुसार वापराच्या क्षेत्राच्या अडीच टक्के वार्षिक दराने भाडे जमा करणे आवश्यक होते. परंतु ते भरण्यात आलेले नाही, अशी तक्रार सचिन दफ्तरे या कार्यकर्त्याने केली होती. त्यानुसार पाच लाख 56 हजार 649 रुपये भाडे अधिक 18 टक्के जीएसटी या वार्षिक दराने भरणे आवश्यक असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

(मुंडे बचाव : ‘वॉक फॉर कमिश्नर’ला पोलिसांचा ‘रेड सिग्नल’)

वादाची ठिणगीआयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर 250 कोटी रुपयांची रस्त्याची कामे रद्द केली. तेथून वादाची ठिणगी पडली. नगरसेवक निधी रद्द करणे, त्रिसूत्रीच्या निकषावर नगरसेवकांची कामे नाकारणे अशा अनेक प्रकारांमुळे बेबनाव वाढत गेला. आयुक्तांनी परस्पर मिळकत करात अवास्तव वाढ केली, असा आरोप करीत नगरसेवकांनी विशेष महासभेतही करवाढ फेटाळली; मात्र आयुक्तांनी महासभेचा आदेशच बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यावर कडी केल्याने वादाचा तो कळस अध्याय ठरला.  अनेकदा प्रयत्न करूनही आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत अशी नगरसेवकांची भावना असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या.

तुकाराम मुंढेंची ओळख

तुकाराम मुंढे 2005 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ 11 महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस