विंचूरला कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: July 18, 2016 00:42 IST2016-07-18T00:06:10+5:302016-07-18T00:42:02+5:30

विंचूरला कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू

Wintur falls into the canal and dies of youth | विंचूरला कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू

विंचूरला कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू

विंचूर : येथील संदीप ऊर्फ गणेश यमाजी जेऊघाले (२२, रा.सावरकर चौक) या तरुणाचा पालखेड कालव्यात पडून मृत्यू झाला.
संदीप हा १५ रोजी सकाळी घरातून निघून गेलेला होता. त्याची मोटारसायकल व चप्पल डोंगरगाव शिवारातील पालखेड डावा कालव्याजवळ आढळून आल्याने त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. लासलगाव पोलिसांकडून तपास चालू असताना आज पोलीस नाईक इप्पर यांना पाचोरे शिवारातील कालव्यात संदीपचा मृतदेह आढळून आला. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहारे व कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Wintur falls into the canal and dies of youth