विंचूर : येथून जवळच असलेल्या अपर्णा प्राईडसमोर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या मिहलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिला ठार झाली. चंद्रकला उत्तम लाड (६०, रा.औराळे ता. कन्नड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे यांच्या सासू चंद्रकला लाड ह्या नाशिक औरंगाबाद महामार्गावरलगत अपर्णा प्राईडसमोर रस्त्या कडेला उभ्या होत्या. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्या जखमी झाल्या, उपचारासाठी लासलगाव येथील रु ग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर शवविच्छेदनासाठी निफाड येथील शासकीय रु ग्णालयात नेण्यात आले. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहारे, पोलिस हवालदार योगेश शिंदे घुगे करीत आहत्ेत.
विंचूरला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 19:50 IST
विंचूर : येथून जवळच असलेल्या अपर्णा प्राईडसमोर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या मिहलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिला ठार झाली. चंद्रकला उत्तम लाड (६०, रा.औराळे ता. कन्नड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
विंचूरला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार
ठळक मुद्देयाबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .