शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Winter : आला थंडीचा महिना... राज्यात सर्वाधिक गारवा नाशकात, पारा ७.३ अंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 23:09 IST

Winter : यंदाच्या हंगामातील सर्वाधिक निचांकी नोंद, सोमवारी दिवसभर वातावरणात गारवा टिकून राहिला. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांच्या वापरास प्राधान्य दिले.

नाशिक : शहर व परिसरात अचानकपणे रविवारी संध्याकाळी हवेत  प्रचंड गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नाशिककरांना संध्याकाळनंतर चांगलीच हुडहुडी भरली. किमान तापमानाचा पारा या हंगामात प्रथमच 7.3अंशापर्यंत घसरला. राज्यात सोमवारी(दि.10) नाशकात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात नाशकात सर्वाधिक नीचांकी तापमानाची यंदाच्या हंगामातील ही पहिली नोंद ठरली. 

नाशिक शहरात शनिवारी दिवसभर ढग दाटून आलेले होते. संध्याकाळी व रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी संधकाळपासून अचानकपणे थंडीची तीव्रता वाढली. किमान तापमान वेगाने खाली आले आणि सोमवारी पहाटेपर्यंत 7.3अंश सेल्सिअस इतकी नीचांकी नोंद झाली. शनिवारी झालेल्या बेमोसमी पावसानंतर वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आणि नाशिककरांना हुडहुडी भरली.

सोमवारी दिवसभर वातावरणात गारवा टिकून राहिला. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांच्या वापरास प्राधान्य दिले. सूर्यास्त होताच पुन्हा शितलाहरींचा प्रभाव अधिक तीव्र होत गेला आणि रात्री आठ वाजेपर्यंत नाशिककर थंडीने गारठले. सोमवारी पहाटे जॉगिंग ट्रॅक परिसरात फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडवल्याचे दिसून आले. गोदाकाठी तसेच बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांनी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला. रात्री 9 वाजेपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला. उत्तरेकडून शीतलहरींचा प्रवास पुन्हा वेगाने सुरु झाल्याने पारा वेगाने घसरणार असून आगामी काही दिवसांत थंडीचा कडाका अधिक वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

शितलाहरींचा वेग 4 ते 10 किमी प्रतितास

नाशिकमध्ये सोमवारी ४ ते १० किमी प्रतितास इतक्या वेगाने शीतलहरी वाहत होत्या. रात्री पुन्हा वेग वाढल्याने थंडीचा कडाका पहाटेपर्यंत अधिक वाढला होता. त्यामुळे नाशिककर गारठून गेले. 

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान असेमुंबई-कुलाबा- 15.2पुणे- 12.0जळगाव 9.0कोल्हापूर 16.9महाबळेश्वर - 10.4मालेगाव 10.2नाशिक 7.3सांगली 15.9सातारा 15.0सोलापूर 16.7औरंगाबाद 11.0नागपूर- 18.3अकोला- 15.5अमरावती 15.1बुलढाणा 12.6 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNashikनाशिक