शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

मन उधाण वाऱ्याचे, ऊन पावसाचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:11 AM

सूर्यास्तावेळी तांबडं झालेलं आभाळ, सांजवेळी अवतरलेली गुलाबी थंडी आणि या रम्य संध्येला हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर आवाजातून होणारे सादरीकरण अशा आल्हाददायक वातावरणात गुरुवारची संध्याकाळ उजळून निघाली. निमित्त होते गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने आयोजित सांज पाडवा या सांस्कृतिक कार्यक्र माचे!

गंगापूररोड : सूर्यास्तावेळी तांबडं झालेलं आभाळ, सांजवेळी अवतरलेली गुलाबी थंडी आणि या रम्य संध्येला हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर आवाजातून होणारे सादरीकरण अशा आल्हाददायक वातावरणात गुरुवारची संध्याकाळ उजळून निघाली. निमित्त होते गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने आयोजित सांज पाडवा या सांस्कृतिक कार्यक्र माचे!  गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने गुरु वारी (दि. ८) बॉईज टाउन विद्यालयाच्या प्रांगणात सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले होते. गणपती श्लोक गायनाने या मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांनी ‘माझे माहेर पंढरी’ या भक्तिगीताने कार्यक्र माची सुरुवात केली.  प्रारंभी गोदाश्रद्धा फाउण्डेशनचे संस्थापक तथा नाशिक मनपाचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नितीन भोसले, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, गोदाश्रद्धा फाउण्डेशनचे अध्यक्ष कृणाल पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. कृणाल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.गायिका सावनी रवींद्र, स्वप्नील गोडबोले, विश्वजा जाधव, सुशीलकुमार मिस्त्री यांनी मन उधाण वा-याचे, राधा ही बावरी, तेरी दिवानी, सैराट झालं जी, रश्के कमर, जीव दंगला अशी एकापेक्षा एक हिंदी-मराठी गीते सादर केली. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सावनी रवींद्र हिने गायलेल्या लावणीच्या वेळी तर उपस्थित असलेल्या लहानग्यांनी थेट मंचावर जाऊन ठेका धरला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकDiwaliदिवाळी