शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

एकलहरे, सामनगावला वादळी वाऱ्याने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 19:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे : परिसरात सलग तिसºया दिवशीही पावसाने वादळी वाºयासह जोरदार हजेरी लावल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, ...

ठळक मुद्देझाड कोसळले, पत्रे उडाले; कांदा चाळीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : परिसरात सलग तिसºया दिवशीही पावसाने वादळी वाºयासह जोरदार हजेरी लावल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर सिद्धार्थनगर झोपडपट्टीत पिंपळाच्या झाडाची फांदी घरावर कोसळून संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाले. सिद्धार्थनगर, हनुमाननगर या भागातही घरांवर झाडाच्या फांद्या कोसळून नुकसान झाले. काही ठिकाणी पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले.

एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरे वसाहत, एकलहरे गाव या पंचक्रोशीत मंगळवारी वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान पूर्वेकडून वादळासह जोरदार मुसंडी मारत पावसाचे आगमन झाले. या दरम्यान सर्व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. एकलहरे वसाहतीतील भाजी विक्रेते, ग्राहक यांची धावपळ झाली. तर सायंकाळी साडेपाच वाजता आॅफिसमधून सुटणाºया चाकरमान्यांची फजिती झाली. सिद्धार्थनगर, हनुमाननगर परिसरात घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले. येथील जिजाबाई रमेश गवळी (६०) या घरामध्ये स्वयंपाक करीत असताना वादळामुळे शेजारील पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी घरावर कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी धावून आले व त्यांनी जिजाबाईला बाहेर काढले. घरावर झाड कोसळल्याने संपूर्ण घरच उदध््वस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.या जोरदार पावसामुळे सामनगाव, कोटमगाव शिवारातील काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे पत्रे उडाल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. कोटमगाव येथील शेतकरी दिनकर म्हस्के यांच्या पार्किंगचे शेड, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळून तारा तुटल्याने व झाडाच्या फांद्या कोसळल्याने नुकसान झाले आहे. सामनगावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवराम पुंजाजी जगताप यांच्या कांदा चाळीच्या शेडचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी केली आहे. या जोरदार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक