शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

कांदा उत्पादकांना रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : हवामान बदलामुळे उत्पादनात घट; बाजारभावाच्या चढ-उताराची धास्ती

गोरख घुसळे।पाटोदा : गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.चांगला दर हाती लागावा म्हणून शेतकरी अपरिपक्व कांदा विक्रीसाठी आणत आहेत. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होत असून, औषधे फवारणीचा खर्च डोईजड होताना दिसत आहे. बाजारभावातील चढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी शेतात उपलब्ध असलेला कांदाविक्र ीवर भर दिला आहे.खरीप कांद्यापाठोपाठ रब्बी रांगडा कांदा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपेही ढगाळ हवामान, धुके व दवामुळे खराब झाली आहेत. त्यांच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. रब्बीच्या गहू, हरभराप्रमाणेच कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पोळ कांदा शेतातच सडून गेल्याने कांदा दरात अचानक वाढ झाली. रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी आवश्यक कांदा रोपेही या पावसाने सडून गेल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येवला तालुक्यासह निफाड, चांदवड, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव या भागातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा रोपांना सोन्याचा भाव आला आहे. मिळेल त्या दराने शेतकºयांनी रोपे खरेदी केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कांदा पिवळा पडत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा निम्मे उत्पादनदेखील हाती लागले नाही.कांदा विक्रीवर शेतकºयांचा भरकांदा लागवड, मजुरी व कीटकनाशक फवारणीचा खर्च लाखात गेला आहे. आज मिळणारा बाजारभाव पाहता शेतकºयांना जास्तीचा दर मिळत आहे असे दिसत असले तरी ते खर्चाच्या हिशेबाने कमी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कांद्याच्या दरात चार हजारांनी घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. बाजारभावातीलचढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकºयांनी शेतात उपलब्ध असलेला कांदा विक्र ीवर भर दिला आहे.सुमारे साठ हजार रुपयांची कांदा रोपे विकत आणून एक एकर कांदा लागवड केली. मजुरी, लागवड खर्च, मशागत असा सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. त्यात बाजारभावात चढ-उतार सुरू असल्याने कांदा उत्पादनासाठी केलेला लाखाचा खर्च वसूल होईल का? याची चिंता आहे.- सुरेश शेलकी,कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगावकांदा लागवडीसाठी सुमारे चारवेळा बियाणे टाकली. अवकाळी पावसाने लागवडकेलेला पोळ कांदा व दुसºयांदा टाकलेले कांदा रोप खराब झाले. तिसºयांदा टाकलेले उळे दाट धुके व दवामुळे खराब झाले. आतापुन्हा बियाणे टाकली असून, बदलत्या वातावरणामुळे त्याचीही शाश्वती राहिलेली नाही. बियाणांसाठी मोठा खर्च झाला आहे.- प्रभाकर बोरणारे,शेतकरी पाटोदा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा