शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

महाराष्टदिनी मिळणार मुकणेचे पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:21 AM

शहरासाठी महापालिकेने शासनाच्या मदतीने आखलेली मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्णत्वास आल्यानंतर आता प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार

नाशिक : शहरासाठी महापालिकेने शासनाच्या मदतीने आखलेली मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्णत्वास आल्यानंतर आता प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार असून, महाराष्टÑदिनी दोन जलकुंभांना जलवाहिनीद्वारे विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे महापालिकेची योजना आणि पाणी देण्याचा निर्णय मुळातच खूप वर्षे अगोदरच झाला असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा किंवा ती शिथिल होण्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या मदतीने मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविण्यात आली आहे. सोळा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेच्या माध्यमातून पाथर्डीसह अन्य नवविकासित भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने एकूण शहराच्या ३० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. २६६ कोटी रुपयांची ही पाणीपुरवठा योजना नुकतीच पूर्णत्वास आली असून आता पाथर्डी फाटा परिसरातील जलकुंभांना विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रांतून थेट जलवाहिनी जोडण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. या भागाला पूर्वी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून सिडकोमार्गे पाणीपुरवठा केला जात असे. आता मात्र तो थांबणार आहे. पाथर्डी फाटा परिसरातील जलकुंभांना नव्या जलशुद्धीकरण केंद्राशी जोडून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़तीन महिन्यांत चाचणीयोजनेच्या चाचणीसाठी सहा महिने लागत असले तरी महापालिकेने तीन महिन्यांत चाचणी पूर्ण केली आहे. ठेकेदाराच्या वाढीव मुदतीनुसार जूनपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असले तरी त्याच्या आतच हे काम पूर्ण होणार आहे. सध्या किमान दोन जलकुंभांमधून १ मे रोजी वितरण होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे कामकाज सुरू आहे.पाणीपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रकविल्होळी जलशुद्धीकरण केंद्रावरून पाथर्डी परिसराला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सिडको विभागावर असलेला ताण कमी होईल त्यामुळे जलकुंभ भरण्याच्या आणि वितरणाच्या वेळादेखील बदलणार आहे. यासंदर्भात प्रकल्प विभागाने वितरणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळापत्रक तयार करण्यास सांगितले असून सध्या हेच काम सुरू आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी