शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मनपा आयुक्तांच्या संकल्पाने गोदावरीचे भाग्य उजळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:17 IST

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला आहे. त्याचे स्वागत असले तरी नदीचे शुध्दीकरण हा अत्यंत गुंतागूंतीचा आणि दीर्घकालीन प्रयत्नांचा विषय आहे. आयुक्तांनी त्यांची नाशिकमधील संपुर्ण कारकिर्दीतील एकमेव अजेंडा म्हणून गोदावरीकडे बघितले तरी खरोखरीच हा प्रश्न कितपत सुटेल या विषयी शंका आहे.

ठळक मुद्देनदी संवर्धनावर भर सशोभिकरणासाठी प्रयत्न

संजय पाठक,

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला आहे. त्याचे स्वागत असले तरी नदीचे शुध्दीकरण हा अत्यंत गुंतागूंतीचा आणि दीर्घकालीन प्रयत्नांचा विषय आहे. आयुक्तांनी त्यांची नाशिकमधील संपुर्ण कारकिर्दीतील एकमेव अजेंडा म्हणून गोदावरीकडे बघितले तरी खरोखरीच हा प्रश्न कितपत सुटेल या विषयी शंका आहे.गोदावरी नदी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याच प्रश्न आहे, असे म्हंटले जाते. परंतु ते जर खरच वास्तव असते तर मुळातच शासकिय यंत्रणा आणि पर्यावरणवाद्यांना त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली नसती. हा संघर्ष सुरू असताना कैलास जाधव यांच्या सारखे गोदावरी नदीच्या संर्वधनाला  प्राधान्य देणारे आयुक्त लाभले ही अत्यंत सुखावह बाब असली तरी अडचणींचा डोंगर ते कितपत पार करतील या विषयी शंका आहे. नाशिक शहरातून जाणारे गोदावरी नदीचे पात्र मर्यादीत आहे परंतु हा विषय गोदावरी पुरता मर्यादीत राहत नाही कारण शहरातील वाघाडी आणि नासर्डी या लहान उपनद्या गोदावरीलाच मिळतात. त्यामुळे एकट्या गोदावरी नदीकडे लक्ष पुरवून उपयोगाचे नाही तर अन्य घटकांचा देखील विचार करावा लागणार आहे.गोदावरी नदीत उद्योग कारखान्यातून होणारे प्रदुषण हा एक भाग,नागरीकांकडून केली जाणारी अस्वच्छता आणि प्रदुषण हा दुसरा भाग तर महापालिकेच्या उणिवांमुळे निर्माण होणारे हा तिसरा भाग होय. यात औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण हा विषय ब-याच अंशी एमआयडीसीच्या अंतर्गत आहे. प्लेटींग सारख्या उद्योगांनी एकत्र येऊन सीईटीपी उभारण्याचा प्रयत्न केला अलिकडेच या उद्योगांना नोटिसा देण्यात आल्या परंतु एमआयडीसीकडूनच अनुदान येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणांचा मुखभंग झाला. नागरीकांची उदासिनता हा तर खूप वेगळा विषय. गोदावरीला पवित्र म्हणायचे आणि याच गोदेत सर्व काही गोदार्पण म्हणून टाकून द्यायचे, वाहने- कपडे- जनावरे धुवायची आणि वरून गोदावरीला जीवनदायिनी म्हणायचे हा निव्वळ दुटप्पीपणा झाला. त्यामुळे हा विषय बाजुला ठेवला महापालिकेकडून होणारे प्रदुषण थांबले तरी खूप काही केल्या सारखे होईल.महपाालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून कमी कमी प्रदुषीत पाणी सोडणे बंधनकारक आहे. मात्र, ते काम गोदाप्रेमींच्या रेट्यामुळे किमान कागदोपत्री पुढे सरकत आहे. गंगापूर येथील एसटीपीचे काम झाले परंतु पिंपळगावचे काम झालेले नाही. ते पुर्ण होत असतानाच निरीच्या नव्या निकषानुसार प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी हा तीसवरून दहा असा करण्यात आला. त्यासाठी सर्व जून्या एसटीपींचे नुतनीकरण करायचे ठरलेतरी त्याला कोट्यवधी रूपये लागणार आहेत. त्यामुळे हे काम किती दिवसात होईल हे सांगतायेत नाही. अगदी तपोवन किंवा टाकळी एसटीपी परीसरात आयुक्तांनी सहज चक्कर मारली तरी अवस्था त्यांच्या लक्षात येईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे गोदावरी शुध्दीकरणासाठी महापालिकेची भूमिका अधिक महत्वाची असली तरी एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळापासून छावणी मंडळापर्यंत सा-यांशी संबंधीत हा विषय आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या यंत्रणेला चालना दिली तरी या अन्य शासकिय यंत्रणा अगदीच संथगतीने काम करीत असल्याचा अनुभव आहे. नदी शुध्दीकरण हा बहुधा त्यांच्या पटलावरील सर्वात शेवटचा विषय असावा, अशावेळी आयुक्त जाधव यांनी केलेल्या संकल्पाचे स्वागतच आहे परंतु त्यांना या यंत्रणांची साथ कितपत मिळते ते महत्वाचे आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी