शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

सोसायटीच्या थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:10 AM

विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हे जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव तालुका उपनिबंधकांकडे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिले आहेत.

नाशिक : विविध कार्यकारी संस्थेचे संचालक हे जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार असतील तर अशा थकबाकीदार संचालकांवर सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव तालुका उपनिबंधकांकडे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिले आहेत. बुधवारी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कºहे व अहेर यांनी दिंडोरी तालुक्यातील जिल्हा बॅँकेच्या कर्मचारी, अधिकाºयांची बैठक घेऊन कर्जवसुलीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना कºहे यांनी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी फक्त ३० दिवस शिल्लक असून, ज्याप्रमाणे परीक्षेच्या काळात चांगल्या गुणांची अपेक्षा असते त्याचप्रमाणे सर्वांनी वसुलीचे काम करायचे आहे. कलम १०१ च्या दाखल्यानुसार कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करायला गेल्यास ट्रॅक्टर जागेवर नसल्यास संबंधित थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच ज्या थकबाकीदार सभासदांवर जप्ती बोजे लागले असतील व ते सभासद कर्ज फेडत नसतील तर निबंधक कार्यालयात प्रकरण दाखल करावे व त्या निकालानंतर संबंधित थकबाकीदाराच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे नाव लावून सदर मालमत्ता बॅँकेची होईल. ट्रॅक्टर कर्जवसुलीसाठी गेल्यावर ट्रॅक्टर जागेवर न सापडल्यास पंचनामा करून थकबाकीदाराविरुद्ध ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना केल्या. पंधरा दिवसांनंतर आपण पुन्हा वसुलीचा आढावा घेऊ, असेही ते म्हणाले. अध्यक्ष केदा अहेर यांनी दिंडोरी तालुक्यातील दोन विभागांतच बॅँकेच्या एकूण कर्जाच्या ३० ते ३५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले असून, जे कर्ज वाटप केले आहे त्याची माहिती कर्मचारी व अधिकाºयांना आहे. त्यामुळे ३१ मार्चअखेर नियोजनबद्ध काम करून वसुली करा. जर वसुली करण्यात अपयशी ठरले तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.कर्जवसुलीचा आढावा घेण्यासाठी बॅँकेच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार असलेल्या बॅँकेच्या सेवकांनी आठ दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्याचा इशाराही दिला. यावेळी स्थानिक संचालक गणपतराव पाटील यांनी थकबाकी वसुलीसाठी मदत करण्याचे तसेच वसुलीकामी कुचराई करणाºयांवर बॅँक अध्यक्षांनी कारवाई केल्यास आपली हरकत राहणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :bankबँक