शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नाशकात स्मार्ट सिटीच्या वादाची "सायकल" सुरूच राहणार?  

By संजय पाठक | Published: October 22, 2020 10:30 PM

नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट  सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे. 

ठळक मुद्देसायकल चॅलेंज प्रकल्पएक कोटी रूपये मिळवण्यासाठी कागदी घोडे

 नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट  सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे. 

शाश्वत  विकासासाठी पर्यवरण स्नेही उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे नॉन मोटराज्ड साधनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.  त्यामुळे सायकलींगला चालना दिली पाहिजे. परंतु त्याची व्यवहार्यता पडताळली पाहीजे. गेले वर्षभर सुरू असलेला शेअर बायसिकलींगचा प्रयोग चालू वर्षीच फसला. आणि हा पीपीपीमध्ये हा प्रकल्प राबवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली. अर्धातास विनामुल्य वापर आणि त्यानंतर देखील माफक दर ही अत्यंत चांगली सेवा होती. शहरात शंभर ठिकाणी सायकल डॉक उभारण्यात आले होते. परंतु मुळातच डॉकचे लोकेशन चुकले आणि तेथून सायकलींची नासधुस सुरू झाली. सायकली चोरी होणे किंवा नुकसान करणे ही मानसिकता चुकीची असली तरी असे प्रकार होऊ नये यासाठी मात्र कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण भयंकर असताना निर्जन ठिकाणी  किंवा अन्यत्र सायकली चोरणे चोरट्यांना कठीण गेले नाही.

हा प्रकल्प सांभाळू न शकणाऱ्या स्मार्ट सिटीने आता सायकल चॅलेंजचा नवा फंडा आणला आहे. केंद्र शासनाकडून सायकल ट्रॅक आणि तत्सम सुविधांसाठी एक कोटी रूपये मिळवण्याच्या अटहासापोटी सध्या शहरात अभिनव सुरू आहे. स्मार्ट सिटी हे प्रकरणच मुळातच  विदेशी आणि कार्पोरेट कल्चरच्या धर्तीवर असल्याने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून खूप काहीतरी केल्याचा आव आणण्याचे प्रकार सुरू आहे. सायकल चालवणे ही मुलांची पहिली धडपड असते. आणि मुले स्वत:च सायकल  शिकतात असे असताना मुलांना सायकल कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्याचा अजब प्रकार कंपनीने केला. सायकल चालवताना कुठे अडचणी येतात हे साधे डोळ्यांनी दिसत असताना त्यासाठी खास सायकल फेरी आणि ॲपचा वापर करीत अशोकस्तंभ ते सातपूर पर्यंत फेरी करण्यात आली. त्यावर कडी म्हणुून कंपनीने एक अफलातून सर्वे केला आणि सायकलस्वारांना तुम्हाला सायकल चालवताना भीती वाटते का कसली वाटते असे बालीश प्रश्न विचारण्यात आले. नागरीकांनी रस्त्यावरील खडडे, उघड्या गटारी, वाहतूक कोंडी आणि भरधाव वेगाने जाणारी वाहने यामुळे सायकल चालवताना अडथळे येतात असा निष्कर्ष प्रचंड मेहनत आणि संशोधानअंती काढला आहे.

मुळात सायकली चालवण्यात अडथळे काय याचा शोध याच स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर घेतला असता तरी अशा स्मार्ट संकल्पांची याच कंपनीने कशी वासलात लावली ते कळले असते. अवघ्या एक किलो मीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या सायकल ट्रॅकचा तर कोणता वापर होत नाहीच उलट मोटार सायकल पार्कींग या ठिकाणी तसेच पादचारी मार्गावर होत आहे.  त्यामुळे संपुर्ण शहरात फिरून काही तरी केल्याचा आव आणण्याऐवजी एवढे केले असते तरी पुरे आहे. सायकल कॅपीटल व्हावी ही साऱ्याच नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, गेल्या चार वषार्त ज्या पध्दतीने कंपनीचे काम वादाशिवाय संपत नाही ते बघता सायकल कॅपीटलचे स्वप्न अशा रीतीने कंपनी पुर्ण करू शकेल काय याविषयी शंकाच आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी