नाशिक : नैसर्गिक जैवविविधतेने समृध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वन्यजीव तस्करींचे प्रमाण वाढल्याचे विविध घटनांवरून समोर येत आहे. पुर्व वनविभागाने नुकत्याच एका कारवाईत दोन पोलिसांसह जिल्ह्यातून तब्बल २० संशयित तस्करांची टोळी फोडण्यास यश मिळविले आहे; मात्र आता नाशिक जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या तस्करीबाबत चालणाऱ्या हालचालींकडे 'वाईल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो' वॉच ठेवून आहे.आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातसुध्दा शहरी भागातील धनाड्य लोक हव्यासापोटी अथवा आपल्या कौटुंबिक नैसर्गिक समस्यांवर उपाय म्हणून अंधश्रध्देला बळी पडताना दिसत आहे. भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसुची-१मध्ये संरक्षित असलेल्या काही ठराविक वन्यजीवांची तस्करी या अंधश्रध्देच्या बाजारात होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा मित्र संबोधला जाणारा मांडूळ जातीचा सर्प, निशाचर घुबड पक्षी, गोड्या पाण्यातील मऊ पाठीचे कासव यासारख्या मुक्या वन्यप्राण्याचा जीव संकटात सापडत आहे.राज्य सरकारच्या वन-वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित कार्यान्वित असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रक ल्पाचे वाईल्डलाइफ क्राईम सेल व मुंबईस्थित वाईल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरोद्वारे आता नाशिककडे खास नजर ठेवली जात आहे. अंधश्रध्देपोटी वन्यजीवांची तस्करी स्थानिक पातळीवर आणि आंतरराष्टÑीय बाजारात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे वन्यजीवांच्या बाबतीत होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या दोन्ही अस्थापनाच्या रडारवर नाशिकमधील अजुन काही संशयित आहेत.वन्यजीवांची तस्करी करण्याकरिता प्रामुख्याने मोबाईलद्वारे सोशलमिडियाचा वापर केला जात असल्यामुळे मेळघाटमधील फॉरेस्ट सायबर सेलदेखील याकडे लक्ष ठेवून आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांमधून अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या मोबाईलची छाननी सुरू करण्यात आली आहे. याद्वारे अजून काही 'मासे' पुर्व वनविभागाच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.अजामीनपात्र गुन्हा; गंभीर शिक्षेची तरतूदअनुसुची-१मधील संरक्षित असलेल्या वन्यजीवांची शिकार किंवा तस्करी करणे हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा अजामीनपात्र स्वरूपाचा असून यामध्ये तुरूंगवासासह आर्थिक शिक्षेचीसुध्दा तरतूद असल्याचे उपवनसंंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले.
तस्कर रडारवर : नाशिकवर 'वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो'चा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:09 IST
वन्यजीवांची तस्करी करण्याकरिता प्रामुख्याने मोबाईलद्वारे सोशलमिडियाचा वापर केला जात असल्यामुळे मेळघाटमधील फॉरेस्ट सायबर सेलदेखील याकडे लक्ष ठेवून आहे.
तस्कर रडारवर : नाशिकवर 'वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो'चा वॉच
ठळक मुद्दे 'वाईल्डलाइफ क्राईम सेल'कडून संभाषणाची चाचपणीअजामीनपात्र गुन्हा; गंभीर शिक्षेची तरतूद