शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:17 AM

चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ३ मे २०१८ साली सिडको परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता.सिडकोमधील पंडितनगरमध्ये राहणारा आरोपी सारीपुत्र पुंजाराम शिंदे हा त्याची पत्नी रमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गवंडीकाम करणारा सारीपुत्र हा रमा माहेरच्यांशी नेहमीच फोनवर बोलत असल्याने तिच्यासोबत वाद घालत होता. यावेळी तो तिला जिवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. ३ मे २०१८ रोजी लग्नाचा वाढदिवस असल्याने दुपारी हे दाम्पत्य आपल्या खोलीत असताना ही घटना घडली होती. आरोपी सारीपुत्र व रमा दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या खोलीतील पलंगावर बसलेले असताना त्याने पत्नीस अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रमाने त्यास चांगलेच खडसावल्याने संतप्त झालेल्या सारीपुत्रने जवळच पडलेला भाजी कापण्याचा चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहुल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेत रमा जागीच ठार झाल्याने राहुल शिंदे याने दिलेल्या तक्र ारीवरून अंबड पोलिसांनी आरोपी सारीपुत्रविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक एस. बी. खडके यांनी करून आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयापुढे हजर क रत दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील रवींद्र निकम यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने परिस्थितीजन्य आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे आरोपी सारीपुत्र यास दोषी धरले व जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 

टॅग्स :Courtन्यायालयjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी