रिमोटच्या कारणावरून अंबड येथे पत्नीचा खून

By Admin | Updated: June 17, 2017 00:58 IST2017-06-17T00:58:04+5:302017-06-17T00:58:12+5:30

सिडको : पत्नीने रिमोट मागितल्याचा राग आल्याने पतीने आपल्या तीन मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली

Wife's murder at Ambad due to the remote cause | रिमोटच्या कारणावरून अंबड येथे पत्नीचा खून

रिमोटच्या कारणावरून अंबड येथे पत्नीचा खून

 लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : पत्नीने रिमोट मागितल्याचा राग आल्याने पतीने आपल्या तीन मुलींसमोरच पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना शुक्रवार (दि. १६) रोजी सकाळी अंबड येथील दत्तनगर भागात उघडकीस आली. खून केल्यानंतर पतीने पलायन केले असून, याबाबत अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की अंबड येथील दत्तनगर-चुंचाळे भागात पांडूरंग लक्ष्मण मानवतकर हा पत्नी शोभा व तीन मुलींसह गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. पांडूरंग हा एका बिल्डरकडे वाचमनचे काम करीत असून, तो मुळचा वाढोणा तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे.
गेल्या गुरुवारी (दि.१५) रात्री टीव्ही पाहत असताना पत्नी शोभा हिने त्याच्याकडे रिमोट मागितला. याचा राग आल्याने पांडूरंग याने रिमोट फेकून दिला व तो घरातून निघून गेला. यानंतर मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास तो पुन्हा घरी आला. यावेळी पत्नी शोभा व पती पांडुरंग यांच्यात पुन्हा किरकोळ वाद झाले.

Web Title: Wife's murder at Ambad due to the remote cause