शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:27 IST

येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. 

ठळक मुद्देसीआरपीएफचे जवान दिगंबर शेळके याचा मृत्यू संशयास्पद मृत्युच्या कारणांची चौकशी व्हावी, शेळके कटुंबियांची मागणी

नाशिक : येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. येवला तालुक्यातील सीआरपीएफचे दिवंगत जवान दिगंबर शेळके यांचा आसाममध्ये मृत्यू झाल्यानंतर सीआरपीएफकडून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला. परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शेळके यांच्या मृत्यूविषयी कोणतीही सविस्तर माहिती अथवा त्यांच्या सेवेपासून मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या सुविधा शेळके कुटुंबीयांना मिळाल्या नाही. त्यामुळे शेळके कुटुंबीयांनी दिगंबर शेळके यांच्या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त करीत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दिगंबर शेळके यांना शहीद घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, शेळके कुटुंबीयांसमवेत. निर्मला पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा महाजन, लक्ष्मिकांत पारनेरकर, आशा निकम, अर्चना श्रीवास्तव, सविता पवार, सचिन खटकाळे, रामदास खटकाळे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.  दरम्यान, दिगंबर शेळके यांच्या निधनानंतर सीआरपीएफने केवळ त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला. परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे कोणतेही साहित्य कुटुंबीयांना पोहोचविण्यात आलेले नाही. तसेच कु टुंबीयांची साधी चौकशीही झाली नसून जवानाच्या मृत्यूनंतर मिळणारे सानुग्रह अनुदान आणि अन्य सुविधांपासूनही शेळके कुटुंबीय वंचित आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती नाशिक जिल्हा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी दिली. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीSoldierसैनिकPoliceपोलिस