सावित्रीबाई फुले यांच्याच नावाला विरोध का? छगन भुजबळ यांचा प्रश्न

By संजय पाठक | Updated: March 28, 2025 22:30 IST2025-03-28T22:28:55+5:302025-03-28T22:30:05+5:30

पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राला आणखी वेगळे नाव देण्यास विरोध

Why is there opposition to the name of Savitribai Phule? Question from Chhagan Bhujbal | सावित्रीबाई फुले यांच्याच नावाला विरोध का? छगन भुजबळ यांचा प्रश्न

सावित्रीबाई फुले यांच्याच नावाला विरोध का? छगन भुजबळ यांचा प्रश्न

संजय पाठक, नाशिक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला कोणा व्यक्तीचे नाव देण्याची गरज काय, राज्यात कोणत्याही विद्यापीठाच्या उपकेंद्राला नामकरण केले जात नसताना केवळ याच विद्यापीठाच्या बाबतीत असा पायंडा घालणे म्हणे फुले यांनाच विरोध कशासाठी असा प्रश्न माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. फुले यांच्यापेक्षा अन्य कोणतेही नाव मोठे नाही त्यामुळे संबंधीतांनी आपल्या शिक्षण संस्थांना नावे द्यावीत असेही त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.२८) पत्रकार परीषदेत यासंदर्भात परखड मत मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे केंद्र नाशिकमधील शिवनई येथे साकारण्यात आले आहे. या उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव अधिसभेत मांडण्यात आला होता. त्याला विरोध म्हणून मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नामकरण करण्याच प्रस्ताव पुढे आला. त्यावरून भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ तसेच अनेक विद्यापीठांची उपकेंद्र आहेत.

मात्र, उपकेंद्राला नाव देण्याची पध्दत कुठेच नाही असे सांगून भुजबळ म्हणाले की, नाशिकला उपकेंद्र आणण्यासाठी आमचा पुढाकार होता. आता उपकेंद्राला अन्य नावे देण्याचा विषय कुठून आला, केवळ फुले यांच्या नावाला विरोध करण्यासाठीच हा प्रकार आहे कााय असा प्रश्न त्यांनी केला.

Web Title: Why is there opposition to the name of Savitribai Phule? Question from Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.