शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

'देवेंद्र फडणवीस 4.5 वर्ष तुम्ही गप्प का,अजित पवारांवर कारवाई का नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 21:22 IST

अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीवरुन राज यांनी मोदींना लक्ष्य केले.

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नाशिकमधील सभेत सर्वप्रथम मनसेने केलेल्या 5 वर्षातील विकासकामांचा व्हीडिओ दाखवून राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका केली. जलसंपदामंत्री याच जिल्ह्यातले आहेत ना, मग आजही महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भिरतोय. फडणवीस एक लाख वीस हजार विहिरी बांधल्याचं सांगतायेत, मग पाणी कुठंय, असाही प्रश्न राज यांनी विचारला.  

जलसंपदा विभागातील 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे काय झालं ? देवेंद्र फडणवीस तुम्ही गप्प का?. अजित पवार आणि सुनिल तटकरेंवर कारवाई का नाही केली. जलसिंचन विभागातील घोटाळ्याचं पुढे काय झालं ? असे म्हणत राज यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही नाशिकमधील सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. नाशिकमधील महिलांची पाण्यासाठी होत असलेली वणवण राज यांनी आज आपल्या व्हीडिओतून दाखवली. 

राज यांच्या भाषणातील मुद्दे

नरेंद्र मोदी यांनी देशात,  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भूलथापा मारल्या.नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी येथील तळ गाठलेल्या विहिरीत महिला दोरखंडाने उतरताना व्हिडीओ दाखवून फडणवीस यांनी खोदलेल्या विहिरी गेल्या तरी कोठे.साडे चार वर्षांपूर्वीचे 70 हजार कोटी रुपये गेले कोठे? भाजपा सरकार देखावा किती करणार? जनतेला लक्षात आले आहे. हे आता तुम्ही लक्षात घ्या.भाजपा शिवसेना सरकारने राज्यात जलसंधारणची कामे कोठे अन कशी केली ? कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला हमीभाव मिळवून देण्याचे आश्वासन देणारे मोदी यांचे भाषण दाखविले अन फेकू चौकीदारच्या घोषणा सुरू

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकAjit Pawarअजित पवार